प्रेम म्हणजे काय असत? प्रेम आणि आयुष्य, प्रेम आणि जीवन, प्रेमाची ताकद आणि प्रेमातील अडथळे, Valentine's day speech in marathi, Valentine's day Images in marathi, Quote on Valentine's day in marathi, What'sApp status Images in marathi
प्रेम,
प्रेम म्हणजे काय असत?
आत्मसमर्पण, विश्वास, त्याग, ,श्रध्दा, भक्ती आणि ताकद- जिथे असते ते प्रेम.
"निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण" म्हणजे प्रेम.
आदरयुक्त भिती, मनाची एकरूपता म्हणजे प्रेम.
प्रेमात कधीही तुझ माझ असत नाही. असत ते "आपल", असतात त्या निरागस भावना, समोरच्या बद्दल वाटणारी आपुलकी, काळजी, माया म्हणजे प्रेम.
प्रेमात कधीही स्वस्त आणि महाग असे गिफ्ट्स असत नाहीत, असतात त्या फक्त " आठवणी ". प्रेमात असणारा माणूस कधीही एकटा किंवा एकटी असत नाही. प्रेमात कधीही कुठल अंतर असत नाही. कुठल वय असत नाही. जिथे गरज असेल तिथे "Thank You" आणि " Sorry " कधी कमी पडत नाही.
सगळ्यात जास्त महत्त्वाच म्हणजे त्याच किंवा तिच सोबत असणे म्हणजे आधार. " आधार " म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्ण असण. समोरचा किंवा समोरची व्यक्ती म्हणजे 'सर्वस्व' किंवा 'श्वास' यापेक्षा अजून कोणत्या शब्दात सांगायच 'प्रेम' म्हणजे काय?
योगायोगाने त्याच किंवा तिच दिसण म्हणजे मोठा आशिर्वाद आणि भेटण म्हणजे चमत्कार अस वाटण ते प्रेम.
निसर्गाने आणि संस्कृतीने पुरूषाला अधिक ताकद दिली आहे ती स्त्रीला भावनिक, शारीरिक आणि आर्थिक आधार देण्यासाठीच. स्त्रीला आई होण्याची ताकद दिली आहे ती पुरुषाला पूर्ण होण्यासाठीच. दोघे मिळूनच एकमेकांना पूर्ण करू शकतात. कुणीही तिच्याशिवाय राजा नाही किंवा कुणीही त्याच्याशिवाय राणी नाही.
पौराणिक कथेत सुद्धा सावित्रीने आपल्या पतीप्रती, प्रिती/प्रेम सिद्ध केले आहे. आणि तेव्हापासून आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमा साजरी करतात, प्रेमाच्या या परीक्षेतून मला कळलेला भावार्थ असा,
पहिला फेर - संवादाचा,
दुसरा फेर - संवादातून निर्माण झालेल्या विश्वासाचा,
तिसरा फेर - प्रेमाचा, आपुलकीचा, काळजी आणि जिव्हाळ्याचा,
चौथा फेर - प्रेमातल्या स्पर्शाचा,
पाचवा फेर - अडचणीत साथ दिलेल्या आधाराचा,
सहावा फेर - नकळत घडलेल्या चुकांच्या क्षमेचा,
सातवा फेर - यातुन निर्माण झालेल्या श्रद्धा आणि भक्तीचा,
खरच पत्नीला अर्धांगिनी का म्हणतात, हे जे लोक अनुभवतात त्यांनाच माहित.
प्रेम फक्त शारीरिक संबंधाच असूच शकत नाही; हा एक आत्मा आहे जो कधी एकमेकांपासून विलग होऊ शकत नाही. त्यामुळेच की काय त्याच्याशिवाय जीवन, आयुष्य अधूर आणि अपूर्णच.
आपली काळजी करणारा आणि आधार देणारा माणूस एखाद्या समुद्रासारखा असतो. जसा एखादा समुद्र लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो तसा.
प्रेमाच कधीही celebration असत नाही, असत ते "नात, प्रेम निभावण" . प्रेमाचा कोणताही महिना, तारीख, दिवस किंवा वर्षे असत नाही. असत ते फक्त निभावण.
माझ्या लेखी काळजी घेण, विश्वास ठेवण, आदर करण आणि आधार देण हेच प्रेमाचे गिफ्ट्स आहेत.
प्रेमात कधी माझ्यासाठी हे कर किंवा हे करू नकोस अस सांगाव लागत नाही. ज्या वेळी जे करायला हव त्या वेळी ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीसाठी करेलच, आणि तस नैसर्गिक, अनैसर्गिक गोष्टींमुळे अपयश आलेच तर समोरच्या व्यक्तीला sorry म्हणेलच. आणि आपल्या पतीला किंवा पत्नीला किंवासगळ्यात छान शब्द म्हणजे आपल्या "प्रेमाला" sorry म्हणायला कसली आली आहे 'लाज' ?
प्रेम शिकवत :आपल्याला कुठे व्यक्त व्हाव; आणि कुठे नाही.
Idial Love आणि Practical Love यामध्ये मात्र खूप तफावत आहे. मुळात हे प्रेम विधिलिखित आहे का? आपली नियती, आपल प्राक्तन, आपले प्रारब्ध यामध्ये येत का? वेळ काळ साथ देईल का या प्रेमाला?
आणि आत्ताच्या काळातला 'मोबाईल' ; तसे मोबाईलचे खूप छान छान फायदे आहेत. पण तरूण मुलांनी आणि इतरांनी त्याचा फायदा कमी आणि गैरफायदाच जास्त घेतला नाही का? यामुळे दोन जिवांमधला, दोन व्यक्तींमधला संवाद कमी झाला नाही का? दूरदर्शन (TV) आणि काही घाणेरड्या Videos मुळे प्रेमाची पवित्रता संपुष्टात गेली नाही का? आता प्रेमामध्ये शारीरिक आकर्षण वाढल नाही का? योग्य वयामध्ये लग्न केल जात नाही हे कारण असेल का? आणि "पैसा"___ पैशाने प्रेम विकत घेता येत? पैशामुळे प्रेम कमी किंवा जास्त होत?
लग्न ही प्रेमाची पुढची परीक्षा. दोन 'जीव' आणि दोन कुटुंबाच मिलन. पण यामध्ये कौटुंबिक गोष्टींमुळे, कुटुंबातल्या व्यक्तींमुळे, असमंजसपणामुळे, गैरसमजामुळे प्रेमात अडथळे येत नाहीत का?
अविश्वास, बेजबाबदारपणा, अहंकार, राग, गैरसमज, मोबाईलचा अतिवापर, पैशाचा माज, शारीरिक आकर्षण, अविचार हे सगळेच प्रेमाचे अडथळे आहेत. ____ अर्थात चांगल मन, चांगली बुद्धि आणि पवित्रता जपली की प्रेम नक्की जिंकेल.
प्रेम ही जगातील सगळ्यात सुंदर, निरागस भावना आहे, मग ती आई-मुलांच प्रेम असेल, बाबांच- मुलांवरच प्रेम असेल, प्रियकर-प्रियसीच असेल, बहिण-भावाच असेल, मित्र किंवा मैत्रिणीच असेल, समाजक्रांती करणाऱ्या समाजसुधारकांच असेल, नवरा बायको मधल असेल किंवा देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच आपल्या देशाप्रती प्रेम असेल__ 'प्रेम' ही जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट आहे.
"प्रेम कधीही हरत नसत, ते असत."











टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा